वाशीम येथे मंगळवारी कुस्त्यांचे भव्य सामने
15 लाखांच्या बक्षीसांची लयलुट : बालगोपाल तालीम मंडळाचे आयोजन
वाशीम - येथील बालगोपाल तालीम मंडळाच्या आयोजनातून स्थानिक लाखाळा परिसरातील संत निरंकारी भवनाजवळील झांझरी लेआऊटमध्ये मंगळवार, 14 जानेवारी रोजी कुस्त्यांचे भव्य सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने विजयी पहेलवानांसाठी तब्बल 15 लाखांची बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. या कुस्ती सामन्याला प्रमुख पाहुणे म्हणून शिवस्मारक समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष आ. विनायकराव मेटे, कळमनुरीचे आमदार संतोष बांगर तर विशेष सत्कारमुर्ती म्हणून कुस्तीसम्राट असलम काझी यांची प्रमुख उपस्थिती राहील. कुस्ती सामन्याचे उद्घाटन म्हणून नगराध्यक्ष अशोक हेडा, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष राजु पाटील राजे, जि.प. सदस्य दिलीप देशमुख हे करतील. यावेळी कारंजाचे आमदार राजेंद्र पाटणी, वाशीमचे आमदार लखन मलीक, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख नागोराव ठेंगडे, शेतकरी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष राजु वानखेडे, डॉ. कानडे, उमेश इंगोले, युवा सेना जिल्हा उपाध्यक्ष सोनु वाटमारे, पुरण बदलाणी, रुपशे विसपुते, राजु चांडक, गणेश खरटकर, पंकज परळीकर, जय भगवान महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल गरकळ, नगरसेवक बाळु मुरकुटे, शिवसेना नांदेडचे जिल्हा उपाध्यक्ष ज्योतीबा खराटे, इंजिनिअर अनिल केंदळे, नगरसेवक आजिमभाई, रियाजभाई हाजी बिल्डर्स, मुकेश ठाकुर, माजी नगराध्यक्ष दिपक भांदुर्गे, नगरसेवक राहुल तुपसांडे, सुपर फॅशनचे संचालक ज्ञानेश्वर वाघ आदींची उपस्थिती राहील.
सामन्याला पंचकमेटी म्हणून आर.के. सर कुरुडवाडी, डुबे सर मुंबई, अॅड. रुपेश चौधरी, पुरुषोत्तम तुपसांडे, समालोचन धनंजय मदने पंढरपुर, हलगीवादक सुनिल नायर पंढरपुर हे काम पाहतील.
या सामन्यामध्ये आजीम मेंबर व बागवान समाजाच्या वतीने 51 हजाराचे प्रथम बक्षीस, उमेश इंगोले यांच्याकडून 41 हजार रुपयाचे दुसरे बक्षीस व ट्रॉफी, राजुभाऊ वानखेडे यांच्याकडून 31 हजार रुपयाचे तिसरे बक्षीस व ट्रॉफी, दिपक वानखेडे यांच्याकडे 21 हजाराचे चवथे बक्षीस व ट्रॉफी, गणेशमामा पवार यांच्यावतीने 11 हजाराचे पाचवे बक्षीस, सरपंच ज्ञानदेव भुतेकर व संजय वाकुडकर यांच्याकडून 7 हजाराचे सहावे बक्षीस व ट्रॉफी, मनसेचे संजय गोटे यांच्याकडून 5 हजार रुपयाचे सातवे बक्षीस व ट्रॉफी व शाम प्रकाश वानखेडे यांच्यातर्फे 3 हजार रुपयाचे आठवे बक्षीस व ट्रॉफी विजेत्या पहेलवानांना देण्यात येईल. मुलींकरीता चेतन काबरा यांच्यातर्फे प्रथम बक्षीस 7 हजार रुपये व ट्रॉफी, वांगीचे सरपंच बाळु भोयर यांच्यातर्फे दुसरे बक्षीस 5 हजार रुपये व ट्रॉफी, सौ. किरणताई गिर्हे यांच्या वतीने तिसरे बक्षीस 3 हजार रुपये व ट्रॉफी देण्यात येईल. विजेत्या पहेलवानांना स्व. वसंतराव ढवळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ढवळे परिवाराच्या वतीने चांदीची गदा दिल्या जाईल. याशिवाय 15 वर्षाआतील सर्वात जास्त कुस्ती जिंकेल अशा मुलांना नितीन शॉपीचे नितीन जाधव यांच्यावतीने स्पोर्ट सायकल दिली जाईल.
तरी या भव्य कुस्ती सामन्याला कुस्ती शौकीन व नागरीकांनी बहूसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बालगोपाल व्यायाम, शिक्षण व क्रीडा प्रसारक बहूुउद्देशिय मंडळाचे अध्यक्ष तथा वाशीम जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष सतिश उर्फ गल्ला वानखेडे यांनी केले आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ